गोसावी समाज हा जगाला दिशा देणारा – युवा नेते किरण गायकवाड

उमरगा : गोसावी समाज हा जगाला दिशा देनारा संताचा समाज आहे. आदी काळापासून गोसावी समाजाने वेळोवेळी धर्मप्रचार नेटाने केला आहे. गुणवंत विद्यार्थी ,समाजगौरव पुरस्कार वितरण सारखे
कार्यक्रम घेउन समाजातील विविध क्षेत्रातील कौतुकास्पद काम करणाऱ्याची दाखल घेतली हे उत्तम कार्य आहे असे प्रतिपादन युवा नेते किरण गायकवाड यांनी केले .
उमरगा – लोहारा दशनाम गोसावी समाजबांधवांनी आयोजित केलेल्या समजाभुषण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान पुरी होते. यावेळी अवधूत पुरी महाराज , प्रख्यात युवाकिर्तनकार अविनाश भारती,माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड ,डॉ. धर्मवीर भारती ,अनिल पुरी,शेखर गिरी ,रमेश भारती,डॉक्टर निलेश पुरी,दिनेश पुरी,धनकुमार पुरी,नितीन गिरी,मुरली गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी नंदा गोस्वामी,राहुल बावा ,प्रवीण गिरी, बाळासाहेब भारती,मोती गोसावी , मोहन गिरी,राजेंद्र गोसावी व साक्षी गोस्वामी यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . तर समाजातील मान्यवरांचा देखील सन्मान करण्यात आला . यावेळी प्रख्यात युवाकीर्तनकार अविनाश भारती यांनी आपल्या वाणी ने आपल्या भाषणातून चौफेर फटकेबाजी केली . तर धर्मवीर भारती ,अनिल पूरी,निलेश पुरी,दिनेश पुरी यांची समयोचित भाषणे झाली. दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष धनराज गिरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुवीर आरणे गुरुजी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनु महाराज ,दीपक गिरी,सतीश गोसावी,बाळू आरणे ,दादा गिरी, अनंत गिरी,बापू पुरी,लक्ष्मण गिरी,ऋषी गोसावी, नरसिंग गिरी,सुनील गोसावी, व्यंकट गिरी,सुभाष गोसावी,वसंत गिरी ,सुरज भारती ,युवा कीर्तनकार कुमारी भगवती गिरी,नवनाथ भारती,शिवाजी बुवा यांनी प्रयत्न केले