धाराशिवराजकीय

लोहारा अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्षपदी रब्बानी नळेगावे – भाजपात उत्साहाचे वातावरण

लोहारा / प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या लोहारा अल्पसंख्याक मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी सास्तुर येथील रब्बानी नळेगावे यांची निवड जाहीर झाली असून भाजपाच्या संघटनात नवा उत्साह संचारला आहे.

ही निवड भाजपाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आली. नळेगावे हे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची नियुक्ती ही तालुक्यातील पक्ष संघटनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

 

नळेगावे यांच्या निवडीमुळे अल्पसंख्याक समाजात पक्षाविषयी विश्वास व जवळीक वाढेल, तसेच तालुक्यातील संघटनात्मक कामाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या नियुक्तीबद्दल विविध स्तरातून मनःपूर्वक अभिनंदन होत असून, लोहारा तालुक्यात भाजप अधिक बळकट होणार असल्याची व्यापक चर्चा आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!