कुणबी मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे

प्रदेशाध्यक्ष अँड तुकाराम शिंदे यांची मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
औसा – प्रतिनिधी
महाराष्ट्र कुणबी मराठा संघटनेचे माध्यमातून कुणब्यांना आरक्षण देण्यासंदर्भात मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन देऊन त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली त्यांनी आपण सामान्य प्रशासन विभाग आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या बैठका लावून ह्या संबंधांमध्ये काय करता येईल हे पाहण्याचे आश्वासन महाराष्ट्र कुणबी मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अँड. तुकाराम शिंदे यांना सांगितले. तसेच काळजी करू नका वकील साहेब या विषयांमध्ये आपण सगळे बसून निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करू. मागासवर्ग आयोगांच्या सचिवांना आणि वेगवेगळ्या कर्मचारी तसेच यासंबंधी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना स्वतः आदेश देऊन ह्या संबंधातली सगळ्या गोष्टीची पूर्तता करून मीटिंग लावा असे आदेश दिले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अँड.तुकाराम शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्रात व विशेषता मराठवाड्यात मोठ्या संख्येने कुणबी मराठा समाज आहे. मागील अनेक वर्षापासून आरक्षणाची मागणी होत आहे पण ती अमलात येत नाही याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली यावर त्यांनी सकारत्मक चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. कुणबी मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे यासाठी प्रदेशाध्यक्ष अँड तुकाराम शिंदे, अंकुश जाधव, शिवाजी गिड्डे पाटिल, लक्ष्मण मदरसे, शिवाजी कराळे, अंबादास खटींग,सोपान शिंदे,सुरेश पाटिल, बाळासाहेब शिंदे, शंकर मगर, केशवराव देशमुख, सत्यवान भोसले,रमेश शिंदे, कल्याण वाघ, प्रताप जाधव, संजय पवार, बालाजी बोडके, अरविंद गायकवाड, बालासाहेब गाडगे, भैय्या पुंड, दत्ताञय उपासे यांच्यासह समाज बांधवांनी केली आहे.
