शिर्डी येथे राज्यस्तरीय 6 वे पर्यावरण संमेलन संपन्न

शिर्डी :  निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य व साईबाबा मंदिर संस्थान शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ” 6 वे पर्यावरण संमेलन ” शिर्डी 2022 दिनांक- 29 व 30 ऑक्टोंबर या दोन दिवसा दरम्यान संपन्न झाले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील व उद्घाटक म्हणून थोर समाजसेवक पद्मभूषण आण्णा हजारे आणि प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री मा. श्री उदय सामंत, भा.प्र.से. उपवसंरक्षक अहमदनगरच्या श्रीमती सुवर्णा माने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जागतिक पाणी परिषदेचे सदस्य श्री रघुनंदन लाहोटी यांनी ” सर्वांगीण ग्रामीण विकास ” आदिवासी पुरस्कार विजेते, ह.भ.प. विशाल महाराज फलके यांनी संत साहित्यातील पर्यावरण, अमेरिकेतील पर्यावरण तज्ञ सौ. संगीता तोडमल यांनी “विदेशातील पर्यावरण संवर्धन काम” या विषयावर उपस्थित पर्यावरण प्रेमींना सविस्तर मार्गदर्शन केले.

HTML img Tag Simply Easy Learning

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी तज्ञ मार्गदर्शक पर्यावरण विज्ञान मा. डॉ. श्री. बी.जे.भोसले यांनी ” जागतिक पर्यावरण, भारताची स्थिती व आपली जबाबदारी ” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातून उपस्थित राहिलेले लोहारा येथील सर्पमित्र श्रीनिवास फुळसुंदर यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री प्रमोद मोरे, कार्याध्यक्ष श्री प्रमोद काकडे,राज्य सल्लागार श्री दत्ताजी जावळे पाटील, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष श्री लक्ष्मण चव्हाण, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य श्री श्रीनिवास फुलसुंदर,जिल्हा संघटक श्री शहाजी जाधव यांच्यासह महाराष्ट्रातील निसर्ग प्रेमी लोक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!