विरोधी पक्ष नेते श्री अंबादास दानवे आज उस्मानाबाद दौऱ्यावर

उस्मानाबाद : आज रविवारी दि 30 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी ८.३० वाजता विधानपरिषद विरोधी पक्ष नेते श्री अंबादास दानवे हे आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणास भेट देणार आहेत. त्यानंतर १० वाजता अंबेजवळगे येथे नुक़सान झालेल्या शेतीची पाहणी करणार आहेत. १०.३० वाजता कारी येथे आत्महत्या ग्रस्त कुटुंबास भेट देणार आहेत. तरी सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे अशी खासदार संपर्क कार्यालय व शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.