मा.न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार शेतकऱ्यांना तात्काळ मावेजा वितरीत करावा – आमदार ज्ञानराज चौगुले

 

उमरगा-लोहारा : उमरगा लोहारा तालुक्यांतील कृष्णा खोरे अंतर्गत विविध सिंचन प्रकल्पांसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्याचा मोबदला म्हणून शासनाने त्या त्या वेळी संबंधीत शेतकऱ्यांना मावेजा पोटी शासन निर्णयाप्रमाणे ठराविक रक्कम मंजूर केली होती. परंतु यातील अनेक शेतकऱ्यांनी सदर भूसंपादनाची वाढीव रक्कम मिळावी म्हणून मा.उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सदर प्रकरणात विलंब होत असल्याने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी शेतकरी व त्यांचे वकील मंडळ यांचे समन्वय होण्यासाठी तहसील कार्यालय उमरगा येथे संयुक्त बैठक २ ऑगस्ट रोजी आयोजित केली होती.

  सदर बैठकीत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शेतकऱ्यांना वेळेत मावेजा देण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवावी, सर्व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावे, मा.न्यायालयाच्या निवाड्यानुसार सर्व शेतकऱ्यांची देयके तातडीने अदा करावे, शेतकऱ्यांच्या कामात पदाचा अहंकार न बाळगता त्यांची कामे तात्काळ करणेसाठी प्रयत्न करावेत, यासह प्रलंबित प्रकरणांची माहिती तात्काळ सादर करणे आदी सूचना अधिकाऱ्यांना केल्या. तसेच महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित असलेले सर्व प्रकरणे मार्गी काढून लवकरात लवकर मावेजा मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना दिले. तसेच यावेळी 17 क वरच्या मुद्द्यावर चर्चा झाली.
यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश पवार, धाराशिव मध्यम प्रकल्प विभाग कार्यकारी अभियंता आर.जे. वाडकर, तहसीलदार गोविंद येरमे, उपविभागीय अभियंता एस.एस.पाटील, नायब तहसीलदार रतन काजळे, शेतकरी सेना तालुकाप्रमुख शाहूराज सावंत, अरुण जगताप, उद्धव मुळे, ऍड.एस.के. बिराजदार, ऍड.सौ.शुभदा पोतदार, ऍड.दयानंद बिराजदार, ऍड.बी.ए. सोमवंशी, ऍड.एन.एस.बिराजदार, ऍड.ए.बी.पेठसांगवीकर, ऍड.एस. एस.पाटील, ऍड.डी.जी जाधव, ऍड. पी.पी.हराळकर आदी सह संबंधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!