महिलांनी आपल्या कलागुणांना, आपल्या प्रतिभांना वाव दिला पाहिजे.. अश्विनी जगताप

चिचवड (प्रतिनिधी ) : आपण विज्ञान व शैक्षणिक क्रांतीमुळे आधुनिक व प्रगत होत आहोत. चुल आणि मूल या निसर्ग नियमा नुसार महिलानी घर सांभाळत आपल्या कलागुणांना, आपल्या प्रतिभांना वाव दिला पाहिजे या दोन्ही आघाड्यांवर काम करतांना महिलांची चांगलीच दमछाक होत असली तरी माझा परिवार, माझे सदस्य या नुसार ती हे सारे मॅनेज करत असते.महिलांनी कला व सुप्त गुणांना वाव देऊन स्वतःच्या विकासाला चालना द्यावी असे प्रतिपादन अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी वाल्हेकरवाडी येथे केले.त्या शेखर चिंचवडे युथ फौंडेशनच्या वतीने आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होत्या.
वाल्हेकरवाडी प्रभाग क्रमांक १७ मधील महिला भगिनींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने गेली १० वर्ष शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करत असते.याही वर्षी महिला भगिनींसाठी गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते नुकतेच या सजावट स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सुविद्य पत्नी अश्विनी जगताप व कन्या ऐश्वर्या जगताप- रेणुसे, माजी नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे,माजी नगरसेविका आरती चोंधे , संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका चंद्रकला शेडगे, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकारी रंजना चिंचवडे , सामाजिक कार्यकर्त्या कविता दळवी,ज्योती ढाके, माधुरी आव्हाळे, निशिगंधा वाल्हेकर , देवयानी पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्या महिला भगिनींना बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल
प्रथम :- इंदू सोमनाथ झोळ (सोन्याचे पेंडंट व पैठणी)
द्वितीय :-संगीता सर्जेराव दराडे (चांदीचा मेखला व पैठणी )
तृतीय :-सिंधू संभाजी मरळ (पूजेचे साहित्य व पैठणी)
चतुर्थ :- गीता आनंदराव शिंदे (पैठणी व समई )
पाचवा :- उज्वला संजय लांडगे (डिझायनर साडी व समई)
याव्यतिरिक्त सहभागी प्रत्येक महिलेला शेखर चिंचवडे यांच्या वतीने प्लास्टिक टाळा कापडी पिशवी वापरा या संदेशा बरोबरच प्रत्येक सहभागी स्पर्धक महिलेला डिझायनर साडी भेट म्हणून देण्यात आली. शेखर चिंचवडे यांनी उपस्थित सर्व मान्यवर महिला भगिनींचे आभार मानले.
शेखर चिंचवडे,संस्थापक अध्यक्ष,शेखर चिंचवडे युथ फौंडेशन
आजच्या काळातील स्त्री माँसाहेब जिजाऊ, सावित्रीमाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व जबाबदार्या पार पाडत कुटुंबासोबत समाजालाही पुढे नेण्याची मानसिकता ठेवणारी आहे. त्यामुळे त्यांच्यात असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी फौंडेशनच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी मागील दहा वर्षांपासून व्यासपीठ निर्माण करून दिले आहे याचं माध्यमातून प्रभागातील महिलांच्या सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी फौंडेशन काम करीत आहे याचाच एक भाग म्हणून मागील दहा वर्षांपासून प्रभागातील महिलांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
शेखर चिंचवडे
संस्थापक अध्यक्ष
शेखर चिंचवडे युथ फौंडेशन