लोहारा (जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील आष्टा कसार येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. सिद्राम करबसप्पा तडकले गुरुजी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार कृषी दिनाच्या निमित्ताने देण्यात आला.समाजातील व्यक्ती आपल्या कार्यक्षेत्रात सर्वसामान्य माणसाच्या माणूसकीच्या नात्याने कार्य करून समाजात एक आदर्श निर्माण करत असतात. म्हणून या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करण्यात येणाऱ्या व्यक्तीला विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.गाव पातळीवर सामाजिक दृष्ट्या कार्य करत असलेल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार हवामान अभ्यासक श्री पंजाबराव डक साहेब, डॉ.एस.एस मगर साहेब माजी कुलगुरू बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, समाज सेवक श्री. यादवराव पावसे पाटील, सरपंच संघटित चळवळीचे नेते श्री बाबासाहेब पावसे पाटील,राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे, सेवा संघाचे सन्माननीय नेते श्री.संजय काळे सरपंच यांच्या शुभहस्ते सहपत्नीक प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम माऊली संस्कृत सभागृह अहमदनगर येथे सोमवार दि.१ जुलै २०२४ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आदर्श सरपंच, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते, यशस्वी शेतकरी, उद्योजक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या वेळी आभार प्रदर्शन अमोल शेवाळे यांनी मांडले.या नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.