
लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता स्कूलमध्ये 15 जून शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यामध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. अतिशय आनंदाने विद्यार्थ्याचे आगमन शाळेमध्ये झाले. या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले. त्यासाठी संपूर्ण शाळा सजवण्यात आली

त्याचबरोबर बस सजवण्यात आली अशा पद्धतीने शैक्षणिक नववर्षाचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे (हावळे )यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. बाल चिमुकल्यांचा सत्कार सोलापूरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने शाळेचा पहिला दिवस आनंदात व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Back to top button
error: Content is protected !!