लोहारा (जि.धाराशिव ) /प्रतिनिधी
पार्वती मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष कै. आबासाहेब साळुंके यांच्या जयंतीनिमित्त आज सास्तुर येथील अपंग निवासी शाळेत सर्व विद्यार्थ्यांना वही, पेन, स्कूल बॅग, फळे इ. वाटप करण्यात आले. तसेच स्पर्श ग्रामीण रुग्णालय येथेही रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी पार्वती मल्टीस्टेटचे चेअरमन अभय साळुंके, संचालक शरद दीक्षित, ग्रा. पं. सदस्य मनोज देशपांडे, सचिन देशपांडे, अण्णाराव देशपांडे, महेश देशपांडे, सदानंद स्वामी, प्रमोद चव्हाण, शेळके सर, हरी पाठक आदींची उपस्थिती होती.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!