जेवळी येथे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू न केल्याने युवकांचे आमरण उपोषण सुरू

जेवळी ( ता.लोहारा ) :- लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथे स्वच्छ भारत मिशन अतंर्गत महादेव मंदिरात मंजूर असलेले सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू न केल्याने येथील दोन युवकांनी सोमवार पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मंदिरातील सार्वजनिक शौचालय बांधकाम दक्षिण दिशेला करायचे का उत्तर दिशेला करायचे यावरून वाद सुरू झाला आहे.

1993 च्या प्रलयंकारी भूकंपात जेवळी गाव बेचिराख झाले होते. शासनाने या गावाचे दोन ठिकाणी भूकंप पुनर्वसन केले आहे. पुनर्वसन बांधकाम गुत्तेदारांनी या गावासाठी या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी महादेवाचे शिखर बांधकाम केलेले मंदिर बांधून दिले आहे. या मंदिरात खासदार शिवराज पाटील चाकूरकर यांच्या खासदार निधीतून दोन मजली सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. महादेव देवस्थान कमिटी व यात्रा महोत्सवाच्या माध्यमातून येथे नव्याने विठ्ठल रूक्कमीणी आणि माता सरस्वती मंदीरे बांधण्यात आली आहे.

अतिशय चांगल्या आणि सोयीसुविधा या मंदिरात असल्याने येथे गावातील आणि आजूबाजूच्या गावातील अनेक विवाह सोहळा येथे होत आहेत. त्याशिवाय येथे विविध धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रम नेहमीच होत असतात. याठिकाणी लघुशंका करण्यासाठी कुठल्या प्रकारची सोय मंदिरात नाही. त्यामुळे या मंदीरातील मैदानात स्वच्छ भारत मिशन या योजनेतून येथे मंदिराच्या उत्तर बाजूला सार्वजनिक शौचालय मंजूर करण्यात आले आहे. मंजूर शौचालयाचे कामही सुरू झाले मात्र जवळच पन्नास फूटावरती हातपंप आहे आणि जवळपास येथील पंचवीस तीस घरातील नागरिक या पंपाच्या पाणी पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे येथील नागरिकांनी या ठिकाणी बांधले जाणाऱ्या सार्वजनिक शौचालयास विरोध केला त्यानंतर पुन्हा एकदा याबाबत ग्रामसभेत हे शौचालय मंदीराच्या दक्षिण बाजूची जागा निवडण्यात आली. दक्षिण बाजूच्या जागेवर बांधकाम करण्यात येवू नये म्हणून येथील काही नागरिकांनी निवेदन देवून केले.

HTML img Tag Simply Easy Learning

मंदिरात शौचालय जागा निवडीवरून येथील शौचालय बांधकाम रद्द होण्याची शक्यता होती म्हणून येथील नागरिकांनी बांधकाम सुरू केल्याने दोन आँक्टोबर पासून उपोषणाचा इशारा दिला होता परंतु विस्तार अधिकारी यांनी येथील उपोषण करणाऱ्या नागरिका सोबत चर्चा करून सहा आक्टोबर पासून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले मात्र आजपर्यंत काम सुरू न.केल्याने येथील युवक नागेश होनाजे,शेतकरी राजेंद्र होनाजे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवार ता 17 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

पाठिंबा
ह्या उपोषणाला युवासेनेचे तालुकाउपप्रमुख शिवराज चिनगुंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रविण बोंदाडे, राम मोरे माजी सदस्य वनिता पीचे, संगप्पा मुखे, अशोक भुसाप्पा,बसवराज स्वामी, रोहित होनाजे, सुधीर कोरे,हेमंत भैराप्पा,निलेश भुसापा, दयानंद होनाजे यांनी पाठिंबा दिले आहे

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!