सुगलाबाई माशाळकर यांचे निधन

लोहारा ( उस्मानाबाद ) : लोहारा शहरातील सुगलाबाई शिवलिंगाप्पा माशाळकर (वय ८६) यांचे सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली,सुना,नातवंडे असा परीवार आहे. जिल्हा बॅकेचे सेवानिवृत्त कॅशिअर दिलिप माशाळकर व सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी श्रीशैल्य माशाळकर यांच्या त्या आई होत.