शैक्षणिक

दिपावली निमित्त किल्ले भेटकार्ड, पणत्या,दिवे, उटणे ,आकाश कंदील, बनवण्याची कार्यशाळा संपन्न….

लोहारा : लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिपावली पूर्वी प्रा. यशवंत चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्कुलमधिल विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालक यांच्या मदतीने किल्ले, भेटकार्ड, पणत्या, दिवे, उटणे, आकाश कंदील इत्यादी दिवाळीत लागणाऱ्या महत्वाच्या वस्तू बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली, यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून यावेळी या सर्व वस्तू बनवण्याचा आनंद लुटत एक वेगळा अनुभव घेतला.

 

याप्रसंगी मिस मीरा माने यांनी विध्यार्थ्यांना दिपावली विषयी सविस्तरपणे माहिती सांगितली की, दिपावली हा सण आपल्या देशातील सर्वांत मोठा सण असून दिवाळीमध्ये भारतीय रुढी व परंपरेने साजरा करण्यात येत असलेले दिवस म्हणजे वसूबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी , लक्ष्मीपूजन, दिपावली पाडवा, अभ्यंग स्नान, भाऊ – बीज, तुलसी विवाह आदी अतिशय उत्साहाने साजरे करतो , म्हणूनच आपण म्हणतो की, ” दिवाळी सण मोठा – नाही आनंदाला तोटा ” त्याचबरोबरच घराघरांमध्ये चिवडा, चकली, शंकरपाळी ,करंजी, गरा लाडू, बेसन लाडू, मोतीचुर लाडू, बालुशाही, म्हैसूर पाक, असे विविध गोड – तिखट पदार्थ बनवतात, एकमेकांच्या घरी हा फराळ खाण्यासाठी बोलावतात तसेच समाजातील गरीब व गरजू कुटुंबातील लोकांना नविन कपडे व फराळाच्या वस्तू भेट देवून त्यांचीही दिवाळी गोड करतात.

HTML img Tag Simply Easy Learning

दिवाळीनिमित्त बाहेरगावी असलेले सर्व कुटुंबातील लोक म्हणजे आजी- आजोबा,मामा -मामी, काका – काकी, मावशी, आत्या, चुलत बहीण – भावंडे एकत्रित येवून अतिशय उत्साहाने व आनंदाने दिवाळी सण साजरा करतात.

 

   याप्रसंगी स्कुलचे मुख्याध्यापक श्री शहाजी जाधव यांनी सर्व पालक, शिक्षक – स्टाफ व विध्यार्थ्यांना दिपावली निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री सिद्धेश्वर सुरवसे, श्री व्यंकटेश पोतदार, मिस सविता जाधव,मिस सोनाली काटे, मिस अनिता मनशेट्टी, मिस स्मिता कोरे, मिस लक्ष्मी करदोरे,मिस ईश्वरी जमादार, मिस सरिता पवार, मिस अर्चना सोनके, मिस रेश्मा शेख, शीतल बिराजदार, बसवराज पंचभाई आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!