गोविंदा आला रे आला च्या जयघोषात शिव मित्र मंडळाच्या वतीने दही हंडी उत्सव साजरा

लोहारा / उमरगा (जि.धाराशिव ) : गोविंदा आला रे आला च्या जयघोषात लोहारा शहरातील शिवनगर येथे सालाबादप्रमाणे सलग२१ व्या वर्षीही शिव मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेली दही हांडी (गोपाळ काला) मंगळवारी (दि.२७) रात्री ८ वाजता शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात फोडण्यात आली.
लोहारा शहरातील शिवनगर येथे गेल्या २१ वर्षापासून शिव मित्र मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दही हंडी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याही वर्षी दही हंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ही दहिहंडी फोडण्यासाठी शिव मित्र मंडळाच्या युवकांनी ३ मानवी मनोरे तयार केले होते. यावेळी श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान केलेल्या अभिजित क्षिरसागर या गोविंदाने मोठ्या जल्लोषात दही हंडी फोडली.

या गोविंदा पथकात धनंजय दरेकर, कमलाकर मुळे, अमोल बिराजदार, राजेंद्र माळी, श्रीनिवास माळी, योगेश बिराजदार, अभय माळी, काका घोडके, शुभम पुकाळे, महेश बिराजदार, हरी चपळे, संतोष माळी, प्रकाश लोखंडे, विक्रम माळी, राम चपळे, अभिजित माळी, गणेश बिराजदार, महेश पाटील, महेश बिराजदार, शिवकुमार बिराजदार, ओम पाटील, अब्दुल शेख, ज्ञानेश्वर माळी, यांच्यासह आदींचा गोविंदा पथकात समावेश होता.
यावेळी अविनाश माळी,अमोल बिराजदार श्रीनिवास माळी, स्वप्नील माटे, बालाजी माळी, किरण पाटील, विष्णू माळी, भैय्या काडगावे, गणेश बिराजदार, संजय दरेकर, शुभम माळी, सोमनाथ मुळे, धिरज माळी, , संकेत माळी, भिमाशंकर मुळे, अशोक काटे, ओंमकर बिराजदार, सुभाष बिराजदार, तम्मा बिराजदार, शिवलिंग साखरे, इकबाल मुल्ला, यांच्यासह शहरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी दही हंडी पाहण्यासाठी बाल गोपाळांसह महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी उपस्थित नागरिकांना काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.