लोहारा शहरात शिवसेना ठाकरे गटाकडून चक्का जाम आंदोलन

लोहारा ( उस्मानाबाद ) : सन २०२० खरीप हंगामाचे उर्वरित ३३१ कोटी रुपये, २०२१ चे ३८८ कोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, सप्टेंबर महिन्यातील नुकसानभरपाई अनुदान २४८ कोटी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आमदार कैलास पाटील हे गेले पाच दिवस झाले करत असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दोन तास चक्का जमा आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर,माजी जि.प.सदस्य अँड. दिपक जवळगे,माजी पंचायत समिती सभापती विलास भंडारे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख शेखर पाटील,नामदेव लोभे,महेबुब गवंडी, सचिन गोरे, श्याम नारायणकर,पंडीत ढोणे, प्रताप घोडके,पवन मोरे,प्रेम लांडगे,अभिजित साळुंके, श्रीकांत वडजे,गणेश जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी या आंदोलनाला कॉग्रेसचे माजी जिल्हा परीषद सदस्य गुंडू आण्णा भुजबळ, युवक कॉग्रेसचे शहरध्यक्ष हरी लोखंडे यांनी उपस्थित राहुन कॉग्रेसचा पाठींबा असल्याचे जाहीर केले.