लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा शहरातील महात्मा फुले जयंती उत्सव समीती अध्यक्षपदी शशीकांत श्रीमंत माळी तर सचिवपदी राहुल बबन माळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
महात्मा फुले युवा मंच लोहारा यांच्या वतीने शहरातील माऊली काँम्प्लेक्स येथे नगरसेवक अविनाश माळी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले जयंती उत्सव समीतीची बैठक घेण्यात आली. यावेळी जयंती उत्सव समीती अध्यक्षपदी शशीकांत माळी,सचिवपदी राहुल माळी, उपाध्यपदीपदी अशोक सुर्यवंशी,सहसचिवपदी नितीन क्षीरसागर, कोषाध्यक्षपदी शंकर माळी यांची निवड करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक श्रीनिवास माळी,युवा मंच अध्यक्ष सचिन माळी,राजेंद्र क्षीरसागर,अमोल माळी, किशोर क्षीरसागर,विष्णु क्षीरसागर, सोमनाथ माळी, दिनेश माळी,श्रीकांत माळी, संजय काटे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, शरण फुलसुंदर, संदिप माळी, अशोक क्षीरसागर,अशोक काटे, गणेश माळी, शुभम माळी, बालाजी माळी,अरुण वाघमारे, लक्ष्मण क्षीरसागर,बजरंग माळी,धीरज क्षीरसागर, बाळु माळी, लक्ष्मण माळी,गजानन वाघमारे, प्रशांत माळी,महेश सुर्यवंशी,बालाजी क्षीरसागर, गहिनाथ क्षीरसागर,बंटी माळी, यांच्या सह युवा मंचचे सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!