धाराशिव : फिर्यादी नामे- वैभव शंकर शेरकर, वय 26 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी (हिताची कॅश मॅनेजमेंट ॲण्ड सर्व्हिसेस प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्यादी दिली की हिताची कॅश मॅनेमेन्ट ॲण्ड सर्विसेस च्या वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करणारा सचिन विलास पारसे, रा. दत्तनगर, तेरणा कॉलेज जवळ धाराशिव ता. जि. धाराशिव एक अनोळखी इसम यांनी दि. 22.03.2024 रोजी 16.00 वा. सु. तुळजापूर मधील नळदुर्ग रोड वरील एचडीएफसी बॅके समोरुन ATM मशीनमध्ये भरण्यासाठी महिंद्रा बोलेरो क्र एमएच 04 जेके 4407 च्या लॉकरमधील लोखंडी पेटी मध्ये ठेवलेली रोख रक्कम 85,00,000₹ हवा भरुन येतो असे सांगून चोरुन नेली आहे, यावरुन दि. 23.03.2024 रोजी तुळजापूर पो. ठाणे गुरनं 132/2024 येथे 406, 409, 420, 381, 120(ब), 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर श्री. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच पोलीस निरीक्षक श्री वासुदेव मोरे व तुळजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. रविंद्र खांडेकर, पोलीस अधीक्षकाचे विशेष पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक खटके, सपोनि कासार स्थागुशा, तुळजापूर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भालेराव तुळजापूर पोलीस स्टेशन,सपोनि चासकर, तामलवाडी पोलीस ठारण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शैलेश पवार आणि स्थानिक गुन्हे शाखेचा व तुळजापूर पोलीस स्टेशनचा स्टाफ यांची विविध पथके रवाना केली. तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी दिलेल्या गोपनिय माहिती व तांत्रिक विशलेषणच्या आधारे पोलीस अधीक्षक विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक खटके व स्टाफ आणि तुळजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव,सपोनि चासकर पोलीस उप निरीक्षक धनुरे व स्टाफ यांनी आरोपी नामे – रवि किसन नामदास, रा. जाणकर नगर सोलापूर यास त्याने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व 20,50,000₹ रोख रक्कमेसह ताब्यात घेवून पुढील तपास कामी तुळजापूर पोलीस ठाणे येथे हजर केले. तसेच गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन पारसे व महेश वर्तक हे कर्नाटक मधील गुंडील पेठ जि. चामराजनगर येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावरुन सपोनि चासकर व पथक हे सदर ठिकाणी रवाना झाले व त्यांनी नमुद दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 4,81,500₹ जप्त केले आहेत. सदर आरोपींना अटक करण्यासाठी गुंडील पेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक परशिव मुर्ती व पोलीस उप निरीक्षक साहेब गौडा यांनी विशेष मदत केली. त्यानंतर अटक आरोपी रवि नामदास यांचे कडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, तुळजापूर पोलीस ठाण्याचे सपोनि भालेराव, चासकर, पोउपनि धनुरे यांनी बारकाईने व कौशल्याने पुन्हा विचारपुस करुन त्याचेकडून गुन्ह्यातील गेला माला पैकी, उर्वरीत 59,50,000 ₹ (एकोनसाठ लाख पन्नास हजार रुपये) हस्तगत करण्यात आलेले आहेत. तसेच गाडी भाड्यासाठी दिलेले 5,000₹ सुध्दा जप्त केलेले आहेत. अशा प्रकारे एकुण 84,86,500₹ जप्त केलेले आहेत. सदरील तीनही आरोपी पोलीस कोठडीत असुन तुळजापूर पोलीस ठाण्याचे सपोनि भालेराव अधिक तपास करत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. श्री. गौहर हसन, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव मोरे व तुळजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. रविंद्र खांडेकर, पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक खटके, सपोनि कासार स्थागुशा, पोलीस ठाणे तुळजापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव, चासकर, तामलवाडी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, तांत्रिक विशलेषण पथकाचे सपोनि प्रमोद भिंगारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हावलदार विनोद जानराव, हुसेन सय्यद, शौकत पठाण,समाधान वाघमारे, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, पोलीस नाईक बबन जाधवर, नितीन जाधवर, पोलीस अमंलदार रविंद्र आरसेवाड चालक पोहेकॉ/ लाटे पोलीस ठाणे तुळजापूरचे पोलीस उप निरीक्षक बांगर, धानुरे, पोलीस हावलदार औताडे, करवार, देटे, सोनवणे, माळी, , क्षिरसागर पोलीस अमंलदार सोनवणे, माळी, वानखेडे, पवार, महिला पोलीस अमंलदार लोकरे चालक रोटे, पठाण, कवडे, तांत्रिक विशलेषण पथकाचे पोलीस नाईक अशोक कदम सुनिल मोरे, तसेच गुंडील पेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पारस शिवा मुर्ती व पोलीस उप निरीक्षक साहेब गौडा यांच्या पथकाने केली आहे.
Back to top button
error: Content is protected !!