पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मराठा उमेदवारांचा मार्ग मोकळा

छावा सह इतर मराठा बांधवांच्या प्रयत्नांना यश

लोहारा ( जि.धाराशिव ) : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने दि.20 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष अधिवेशन घेवुन महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास्वर्गांकरिता आरक्षण अधिनियम, 2024 एकमताने संमत केला होता.
यानंतर शासनाच्या वतीने 17000 पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली. व या भरतीमध्ये शासनाने मराठा समाजातील तरुणांसाठी SEBC या प्रवर्गातून राखीव जागा ठेवल्या आहेत. परंतु मराठा समाजाला
जात प्रमाणपत्र वितरित करण्यासंदर्भात शासनाकडून परिपत्रक न निघाल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी आरक्षित प्रवर्गातून अर्ज करण्यास अडचणी येत होत्या.

यासंदर्भात छावा क्रांतिवीर संघटना, उमरगा यांच्या वतीने आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडे दि. ९ रोजी भेट घेवुन निवेदन प्राप्त दिले होते.

या अनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी तात्काळ पत्रव्यवहार व फोनद्वारे संपर्कही केला होता. यानंतर याची दखल घेवुन काल दि.11 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठा समाजाला जात प्रमाणपत्र वितरित
करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

यामुळे मराठा उमेदवारांना या पोलीस भरतीसह इतर सर्व भविष्यातील नोकर भरतीमध्ये आरक्षित प्रवर्गातून अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!