जेवळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती बसवराज कारभारी यांची निवड

सुधीर कोरे

जेवळी, ( जि.उस्मानाबाद )
जेवळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अपेक्षेप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती बसवराज कारभारी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी नंतर ग्रामपंचायतीच्या नुतन पदाधिकारयांची कार्यकर्त्याकडून फटाक्याची आतिशबाजी व हलग्याच्या कडकडाटासह गावातून मिरवणूक काढण्यात आली.
जेवळी (ता लोहारा) ग्रामपंचायतीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उपसरपंच मोहन पणुरे व मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बसवराज कारभारी यांच्या नेतृत्वाखालील श्री बसवेश्वर ग्राम विकास पॅनलचे सरपंचासह सतरापैकी चौदा जागांवर विजय मिळवून ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बुधवारी (ता.५) उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची येथील ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलवण्यात आली होती.

HTML img Tag Simply Easy Learning
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून शाखा अभियंता (पाणीपुरवठा) आर आर संगमकर व साहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी आर.एन.वाघमारे यांनी काम पाहिले आहे. यावेळी श्री बसवेश्वर ग्रामविकास पॅनेलकडून बसवराज मैलारी कारभारी तर शिवकृपा ग्रामविकास पॅनेलकडून विश्वनाथ हरिबा राठोड यांनी अर्ज दाखल केला होता. या दोघांची उमेदवारी अर्ज ही शेवट पर्यंत राहिल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी हात उंचावून मतदान घेतला. यात विश्वनाथ राठोड यांना १७ पैकी ३ तर बसवराज कारभारी यांना १७ पैकी १४ सदस्यांचे मतदान केल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी बसवराज कारभारी यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची जाहिर केले.
या निवडी नंतर नुतन सरपंच सौ. महानंदा पणुरे, उपसरपंच बसवराज कारभारी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पणुरे लोहारा तालुकाप्रमुख जग्गनाथ पाटील, जेवळी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्रीशैल ढोबळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष माळी, वनिता कारभारी, माजी उपसरपंच पंडित पाटील, सुभाष बिराजदार, युवा सेनेचे तालुका उपप्रमुख शिवराज चिनगुंडे, ग्रामविकास अधिकारी आर.एन.वाघमारे तलाठी हणमंत जमादार, युवक काँग्रेसचे शाखाध्यक्ष रोहित कारभारी, दत्तात्रय स. गाडेकर, गोपाळ जेवळीकर, सुरेश दंडगुले, गुंडाप्पा कारभारी, शिवाजी जेवळीकर कल्याणी ढोबळे, संजय तांबडे, संजय पवार, श्रीशैल बिराजदार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!