दत्तजयंती यात्रा महोत्सवाची उत्साहात सांगता

किल्लारी / प्रशांत नेटके
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील दत्त आश्रमात दत्त जयंती महोत्सव सोहळा 16 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दत्त जयंती यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने परमपूज्य सद्गुरू सौ. महानंदा माता यांच्या अनुष्ठान सोहळ्यानिमित्त गुरुचरित्र पारायण ,श्रीमद भागवत कथा , पालखी मिरवणूक आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रीमद भागवत कथेसाठी वृंदावन येथील कथाकार देवी वैभवी श्री जी , कीर्तन सेवेसाठी हभप लक्ष्मण महाराज पाटील (आळंदीकर) , यांची उपस्थिती लाभली.
बुधवार दिनांक 27 डिसेंबर रोजी हभप लक्ष्मण महाराज पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर श्री ची आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दत्त जयंती यात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आयोजक बालयोगी दत्ता महाराज जी यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तगुरु सेवा मंडळाचे तपसे चिंचोली , मुंबई , पुणे सातारा सह आजूबाजूच्या गावातील कार्यसेवक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.