चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल मुळ मालकास परत

 

धाराशिव : मा. पोलीस अधिक्षक यांचे संकल्पनेतुन धराशिव जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावून चोरीस गेलेला माल पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकां मार्फत जप्त केला जातो. व मुळ मालकास परत करण्याचा कार्यक्रम मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. गौहर हसन यांच्या संक्लपनेतुन आज दि.12.03.2024 रोजी 17.30 वा. सु. पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सभागृह येथे घेण्यात आला. यात बेंबळी, येरमाळा, तुळजापूर, धाराशिव ग्रामीण, वाशी, शिराढोण, धाराशिव शहर पोलीस स्टेशनच्या 13 गुन्ह्यातील मुद्देमाल ज्यात 506 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे, मोटरसायकल व 41 मोबाईल फोन असा एकुण 31,10,080 ₹ किंमतीचा मुद्देमाल मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मुळ मालकास परत करण्यात आला.
सदर कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक- श्री. डोगंरे, श्री काचुळे, पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस स्टेशन येथील अधिकारी अंमलदार तसेच 35 ते 40 मुळ मालक हे उपस्थित होते. मौल्यवान माल परत मिळवून दिल्याबद्दल या प्रसंगी मालमत्ता धारकांने पोलीसांचे आभार व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!