लोहारा (धाराशिव ) : खरीप 2020 मधील विलंब रकमेसाठी व्याज मागणी याचिका जिल्हा तक्रार निवारण समितीकडून मंजूर व्याजापोटी जवळपास 110 कोटी 40 लाख रुपये मिळणार याचिका करते अनिल जगताप यांची माहिती.
खरीप 2020 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील 9 लाख 48 हजार 990 अर्जदार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता 72 तासात पूर्व सूचना दिल्या नाहीत या तांत्रिक मुद्द्या आधारे बजाज अलायन्स पिक विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यावर्षी केवळ 56 कोटीचे वाटप केले होते .याविरुद्ध शेतकरी, लोकप्रतिनिधीने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर शेतकऱ्याच्या बाजूने ऐतिहासिक निकाल देत प्रती हेक्टर 18 हजार रुपये प्रमाणे 544 कोटी रुपये देण्याचे आदेश पीक विमा कंपनीला दिले होते.
त्यापैकी आत्तापर्यंत 376 कोटी रुपयांचे वाटप झाले असून उर्वरित 168 कोटी रुपये साठी उच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे.

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020 मध्येच ही रक्कम मिळायला पाहिजे होती मात्र ती कंपनीने दिली नाही म्हणून पिक विमा शासन निर्णय 29 जून 2020 मधील तरतुदीनुसार मुद्दा क्रमांक 25 क मधील 21 नुसार व्याज मागणी याचिका अनिल जगताप यांनी दाखल केली होती त्यावर एक मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबाशे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन त्यात याचिका मंजूर करून जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीस विमा हप्ता अनुदान कोणत्या तारखेला व किती उपलब्ध करून दिलेली आहे याची माहिती कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त करून घेऊन व्याजाच्या रकमेची निश्चिती कशी विभागाने करावी व कृषी विभागाने निश्चित केलेली व्याजाची रक्कम विमा कंपनीने शेतकऱ्यांना वितरित करणे करता कृषी विभागास उपलब्ध करून द्यावी असे आदेश दिले आहेत.
आत्तापर्यंत 376 कोटी रुपये वाटप झाले असले तरी त्यातील 56 कोटी रुपये 2020 मध्येच वाटप झाले आहे आत्तापर्यंत 320 कोटी वाटप झाले असून तीन वर्षाचे 12 टक्के व्याजदराने जवळपास 110 कोटी 40 लाख रुपये होतात.
कृषी विभागाने याबाबत कृषी आयुक्तालयाला पत्र दिले असून अनुदान दिलेल्या तारखा मागवल्या आहेत.
बजाज अलायन्स पिक विमा कंपनीने शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे 2020 मध्ये दिले नाहीत पिक विमा शासन निर्णयानुसार व्याज मागणी याचिका दाखल केली होती ती मंजूर झाली आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 110 कोटी रुपये मिळणार आहे त्याचा मनातून आनंद आहे. ज्या पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई देणार नाहीत त्यांना व्याजासह रक्कम द्यावी लागेल.
अनिल जगताप याचिकाकर्ते व्याज मागणी याचिका 2020
Back to top button
error: Content is protected !!