धाराशिव

सेवानिवृत्त शिक्षकांनी महिलांसाठी घेतला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम

 

लोहारा ( धाराशिव ) :- सेवानिवृत्त बहुउद्देशीय सामाजिक संस्था आष्टा कासार या संस्थेतर्फे दि. 26 जानेवारी 2025 रोजी दत्त मंदिर येथे बहुसंख्य महिलांच्या उपस्थितीत श्री सिद्धेश्वर फाउंडेशन सोलापूर च्या सौजन्याने लेकीच्या नावे वृक्षारोपण व वैद्या सौ. मेघाताई वनारोटे आयुर्वेदाचार्य यांचे आरोग्यासह सौंदर्य सोहळा या विषयावर सुंदर असे मार्गदर्शन पार पडले.

मुली, स्त्रिया आज काल वापरत असलेल्या सौंदर्य प्रसाधने हे शरीरास अपायकारक आहे.व दररोजचे आहार कसे,कोणते व केव्हा घ्यावे यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. सौंदर्य प्रसाधनेचा दुरुपयोग त्याचा होत असलेला विपर्यास यावर महिलांना सुंदर व सविस्तर असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती रु.रा. कोरे सहाय्यक धर्मादाय आयुक्त धाराशिव या होत्या. कोरे आयुक्त मॅडम यांनी ही स्त्रियांच्या विविध समस्या वर मार्गदर्शन केले. यावेळी श्री सिद्धेश्वर फाउंडेशन सोलापूरचे अध्यक्ष सर्जे सर हजर होते तसेच आष्टा कासार च्या पोलीस पाटील सौ. संजीवनी व्यंकट चौधरी, सौ. शीलाताई शिवाजी खडबडे, सौ.मंगल बाबुराव माळी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रथमतः सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे व श्री दत्तात्रयाच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी बहुसंख्य गावातील महिला, सर्व अंगणवाडी ताई व आशा कार्यकर्त्यां या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या.

HTML img Tag Simply Easy Learning

तसेच नुकतीच आष्टा हायस्कूल आष्टा कासार या शाळेची शैक्षणिक सहल कर्नाटक राज्यात जाऊन आली या शैक्षणिक सहलीचे उत्कृष्ट असे वर्णन लिखाणातुन स्वतःच्या भाषेत करणाऱ्या तिन विद्यार्थ्यास बक्षीस देऊन प्रोत्साहित केले. यानंतर सर्व महिला व प्रमुख अतिथी यांनी हळदी कुंकवाचा व वाण लुटण्याचा सुंदर असा कार्यक्रम हसत खेळत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव सुलतानपुरे गुरुजी, सचिव सिद्रामप्पा तडकले, सहसचिव सुभाष बलसुरे, चंद्रकांत बनसोडे, मनोहर वाघमोडे,अंकुश सोमवंशी, विलास पोतदार, राहुल गायकवाड, महादेव तडकले,मुरलीगिरी गोसावी,चांदशहा अष्टेकर, शरणाप्पा शिदोरे, ब्रह्मानंद कडते, राजेंद्र बलसुरे, चंद्रकांत आळंगे व इतर सर्व सेवानिवृत्त शिक्षकांच्या सहकार्याने उत्कृष्टरित्या कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. दिपाली बलसुरे यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडले. आभार प्रदर्शना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!