शेती पिकांच्या नुकसानी पोटी लोहारा, वाशी, धाराशिव या तालुक्याला अनुदान जाहीर – सामाजिक कार्यकर्त – जगताप

धाराशिव : चालू वर्षीच्या दुष्काळी स्थितीमुळे बाधित झालेल्या शेती पिकाच्या नुकसानी पोटी लोहारा, वाशी, धाराशिव या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकासाठी 208 कोटी रुपये चे अनुदान काल राज्य शासनाने जाहीर केले असून निधी मंजूर केला आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी दिली आहे.

राज्य शासनाने 31 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय काढून राज्यातील 40 तालुक्यांमध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता त्यात लोहारा ,वाशी ,धाराशिव या तीन तालुक्याचा गंभीर दुष्काळ असलेल्या तालुक्यांमध्ये समावेश केला होता. नियमानुसार या सर्व तालुक्यांना एस डी आर एफ व एनडीआरएफ अंतर्गत मदत करणे अपेक्षित होते. मध्यंतरी केंद्रीय पथकाने येऊन धाराशिव जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत गंभीर दुष्काळ असल्याचा सकारात्मक अहवाल केंद्र शासनाला दिला होता.

काल 29 फेब्रुवारी 2023 रोजी राज्य शासनाने शासन निर्णय काढून गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असलेल्या चाळीस तालुक्यासाठी 2443 कोटी रुपयांची मदत ,अनुदान जाहीर केले आहे तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून निधी मंजूर केला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुक्यातील एक लाख 64 हजार 259 शेतकऱ्यांना 208 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
लोकसभेचे लोकसभेची लवकरच आचारसंहिता लागणार असल्याने ही मदत आचारसंहितेच्या कचाट्यात अडकते की काय अशी भीती वाटत होती मात्र काल राज्य शासनाने निधी मंजूर केले बाबतचा शासन निर्णय काढल्याने तातडीने शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान मिळेल. सदरील निधीसाठी कोणत्याही बँकेने शेतकऱ्याच्या खात्याला होल्ड लावू नये अशी ही शासन निर्णय नमूद केली आहे ती जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवली आहे.गेल्या एक महिन्यापासून ही मदत मिळावी म्हणून अनिल जगताप यांनी शासन दरबारी प्रयत्न केले होते.

 

HTML img Tag Simply Easy Learning

तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना 208 कोटीचा निधी मंजूर केल्याने थोडी खुशी थोडा गम आहे संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ असताना केवळ तीनच तालुक्याला दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने उर्वरित तालुक्यांचाही विचार करायला हवा आहे . मात्र सदरील निधीमुळे तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल.
अनिल जगताप सामाजिक कार्यकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!