लोहारा ( जि.धाराशिव ) : कॉग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील यांनी भाजप पक्षात यांनी जाहीर प्रवेश केला आहे. माजी मंत्री बसवराज पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व केंद्रिय मंत्री भगवंत खुबा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भाजप पक्षात जाहिर प्रवेश केला. यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील, आ. अभिमन्यू पवार, धाराशिव भाजपा जिल्हाध्यक्ष संताजीराजे काका चालुक्य पाटील, भाजप सहकार आघाडीचे प्रदेश सहसंयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅड. नितीन भोसले, अॅड. अनिल काळे, प्रविण पाठक, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भाजपाने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. बसवराज पाटील यांना धाराशिव व लातुर जिल्हात मानणारा मोठा गट असुन शिक्षण संस्था सहकार असे मोठे जाळे आहे. त्यामुळे त्यांचा फायदा भाजप पक्षाला होणार आहे. व पक्षाची ताकत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.