
लोहारा ( जि.धाराशिव ) : आपल्या प्रगतीचा आलेख नेहमीच उंचावत ठेवणारे आणि शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविनारे लोहारा शहरात मागील 10वर्षापासून सुरु असलेले न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय दिमाखात संपन्न झाले,याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल संस्थाचालक संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मण दादा सरडे, उद्घाटक म्हणून भाजपा उमरगा – लोहार विधानसभा प्रमुख श्री राहुल दादा पाटील, लोहारा न. पं.च्या नगराध्यक्षा सौ वैशालीताई खराडे, उपनगराध्यक्ष श्री आयुब हबीब शेख, प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे माजी गटनेते श्री अभिमान खराडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास भोसले, कौडगावचे सरपंच श्री बालाजी भोसले, नगरसेविका शामलताई माळी, सौ अश्विनी कळसकर, संचालिका माधुरी जयराम चोबे, श्री शिवराज झिंगाडे, श्री सतिश गिरी, श्री अभिजीत जाधव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

सर्वप्रथम स्कुलमध्ये मान्यवरांचे आगमन होताच महिला शिक्षकांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले, त्यानंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते कलेची देवता नटराजाचे व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उद्घाटन करण्यात आले. स्कुलतर्फे सर्व मान्यवरांचे शॉल व स्मृतिचिन्ह भेट देवून सत्कार करण्यात आला. स्कुलचे संस्थापक तथा प्राचार्य श्री शहाजी जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या दशकपूर्ती निमित्त मागील 10 वर्षातील शाळेचा गुणवत्तेच्या जोरावर चढता असलेला आलेखाची माहिती देवून शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी घेण्यात आलेल्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धेतील यशस्वी उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी श्री राहूल पाटील, श्री अभिमान खराडे आणि श्री सतीश गिरी यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणात श्री लक्ष्मण सरडे यांनी सांगितले की, या स्कुलचे संचालक सौ सविता जाधव, प्राचार्य श्री शहाजी जाधव हे दांपत्य क्रांतिज्योती सावित्रीबाई व महात्मा फुले यांचा वारसा पुढे चालवत लोहारा तालुक्यासारख्या ग्रामीण भागात न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबध्द असून त्यांची जिद्द ,चिकाटी व प्रामाणिकपणा यांच्या जोरावर भविष्यात त्यांचे ध्येयपूर्तीसाठी काम करत राहावे, शाळेच्या दशकपूर्ती सोहळा व भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास स्कुलमधिल चिमुकल्यांनी श्री गणेश वंदनेने सुरुवात केली.

त्यानंतर आमच्या पप्पांनी गणपती आणला, माझ्या नावानं बंगला बांधला, नाखवा बोटीने फिरवाल का हे कोळी नृत्य, दैवत छत्रपती, रांगिलो म्हारो धोलना, मैं निकला गड्डी लेके, तुझमे रब दिखता है, कोळी गीत, राजस्थानी नृत्य, गुजराती गरभा,पंजाबी नृत्य, अंगात आलया, गोंधळगित, जलवा,जय हो, पुष्पा, ऑल इज वेल, मेरावाला डान्स असे प्रसिद्ध बॉलीवुड नृत्य, पाटलांचा बैलगाडा, आले मराठे , नववारी साडी पाहिजे, मंगळागौर, गौरव महाराष्ट्राचा हे मराठी लोकनृत्य, इस्रो व चांद्रयान – 3 आजी – आजोबा यांची नाटिका, याबरोबरच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर निर्माण झाल्याची महती दर्शविणारे मेरे घर राम आये है हे नृत्य आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नाटकाच्या माध्यमातून सादर केलेला राज्याभिषेक सोहळ्याने उपस्थितांचे मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिस सविता जाधव व मिस सोनाली काटे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. यशवंत चंदनशिवे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कुलमधील शिक्षक – शिक्षिका श्री सिद्धेश्वर सुरवसे, श्री व्यंकटेश पोतदार, श्री प्रेमदास राठोड, मिस पुजा चौरे, माधवी होगाडे, अनिता मनशेट्टी, ईश्वरी जमादार, मीरा माने, अर्चना सोणके, सरिता पवार, चांदबी चाऊस, रेश्मा शेख, शीतल बिराजदार, तसेच कर्मचारी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी पत्रकार, कला प्रेमी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Back to top button
error: Content is protected !!