लोहारा/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या सहकार आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी श्री सिद्धिविनायक समुहाचे अध्यक्ष तथा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड झाली आहे. दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी श्री सिद्धिविनायक उद्योग समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यात हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट तसेच गुळ पावडर कारखाने यशस्वीरित्या सुरु आहेत. समुहाने विमा क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. त्यांच्या उद्योग क्षेत्रातील कामाची दखल घेऊन पक्षाने सहकार आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.