लोहारा ( जि.धाराशिव ) : २९ सप्टेंबर १९९३ रोजी लातूर व धाराशिव जिल्हयातील काही भागात भुकंप होऊन मोठया प्रमाणात जिवीत व वित्त हानी झाली होती. यामध्ये उमरगा लोहारा व निलंगा औसा तालुक्यातील अनेक गावे बेचिराख होऊन अनेक संसार उघडयावर आले होते. तत्कालीन शासन व विविध सेवाभावी संस्थां यांच्यामार्फत या सर्व गावांचे पुनर्वसन करून सर्वांना राहण्यासाठी घरे, भूखंड वाटप करण्यात आले होते. परंतु या घरांचे अथवा भुखंडांचे हस्तांतरण करण्यास परवानगी नसल्यामुळे येथील लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती.
यासंदर्भात आमदार ज्ञानराज चौगुले यांनी विधीमंडळात वेळोवेळी आवाज उठवण्यासोबतच विनंती करून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निल्हम ताई गोरे यांच्या अध्यक्षतेखाली ३० सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर आणि २९ नोव्हेंबर रोजी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत भुकंप पुनर्वसन बाबतच्या विविध समस्या मांडल्या होत्या. सदर बैठकीस आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह औसाचे आमदार अभिमन्यु पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, शिवसेना भुकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष फजल कादरी, उपतालुकाप्रमुख बी.के.पवार, माजी उपसरपंच बालेपीर शेख हे उपस्थित होते.
आमदार ज्ञानराज चौगुले यांनी भुकंपग्रस्तांसाठी केलेल्या सातत्यपुर्ण पाठपुराव्याला यश आले असुन तालुक्यातील उमरगा, लोहारा, औसा व निलंगा “अ” व “ब” वर्गवारीच्या गावातील भुकंपग्रस्तांना दिलेले घर, रहिवासी करणयासाठी दिलेल्या भुखंड व दुकानांचे हस्तातरण, करण्यावरही निर्बंध उठविण्यास परवानगी दिली आहे. तसेच मिळालेली घरे, भुखंड व दुकाने यांची खरेदी-विक्री, वाटणी अदलाबदली, व दान करता आणि गहाण ठेवता येणार आहेत. भुकंपग्रस्त नागरिकांची समस्या दुर केल्याबददल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ.निल्हम ताई गोरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, भुकंप पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री तानाजी सावंत व सदरकामी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबददल माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड यांचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आभार व्यक्त केले आहेत.