उमरगा येथे दशनाम गोसावी समाज बांधवांचा स्नेहमेळावा

उमरगा ( उस्मानाबाद ) : उमरगा- लोहारा दशनाम गोसावी समाज बांधवांचा स्नेहमेळावा ३० आक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे . या मेळाव्यात समाजभूषण पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास उदघाटक म्हणून आमदार ज्ञानराज चौगुले ,प्रमुख वक्ते प्रख्यात युवाकीर्तनकार अविनाश भारती, सोलापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे युवानेते किरण गायकवाड,माजी नगराध्यक्ष हंसराज (राजू)गायकवाड ,लातूरचे उद्योजक धर्मवीर भारती, अनिल पुरी(लातूर) , रमेश भारती(लातूर),उपस्थित राहणार आहेत. नंदा गोस्वामी (उमरगा ),राहुल बावा (लातूर),प्रवीण गिरी(निलंगा), बाळासाहेब भारती (लातूर),मोहन गिरी (उमरगा), राजेंद्र गोसावी(भोसगा ) यांना समाजभूषण पुरस्कारने गौरवण्यात येणार आहे.
उमरगा येथील श्रीराम मंगल कार्यालय येथे ३० आक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रम होणार असून , समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन उमरगा – लोहारा दशनाम गोसावी समाज यांनी केले आहे .