धाराशिव : काल माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांची भेट घेतली आणि उर्वरित खरीप 2022 – 23 च्या पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी केली होती त्यानुसार आज शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत याचा मनातून आनंद होत असल्याची भावना विमा याचिका करते अनिल जगताप यांनी लोकशक्ती न्युज कडे बोलून दाखवली.
काल शेतकऱ्याच्या एका शिष्टमंडळासह अनिल जगताप यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे भेट घेऊन खरीप 2022 ,23 मधील थकलेली पिक विम्याची रक्कम ,गेल्या वर्षीच्या सततच्या पावसाचे अनुदान, प्रोत्साहन अनुदान ,कांदा अनुदान तसेच चालू वर्षाच्या लोहारा, वाशी धाराशिव या तालुक्यातील 208 कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान तसेच धाराशिव जिल्ह्यातील 27 महसूल मंडळाला दुष्काळ सदृश्य परिस्थिती प्रमाणे अनुदान व उर्वरित अकरा महसूल मंडळाचा दुष्काळी यादीत समावेश करावा अशी आग्रही मागणी त्यांच्याकडे केली होती.

तसेच श्रीराम मंदिर देवस्थान कसबे तडवळे यांच्या जमिनीवर रखडलेल्या शेतकऱ्याचा पिक विमा तसेच रेल्वे भूसंपादन रक्कम या संदर्भाची चर्चा केली होती शेतकऱ्याच्या बाजूने सकारात्मक निर्णय देण्यात येतील असे संकेत कालच माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी दिले होते.
धाराशिव जिल्ह्यात सध्या खरीप 2022 मधील उर्वरित 232 कोटी रुपये रकमेचे वितरण सुरू आहे मात्र मध्यंतरी बऱ्याच शेतकऱ्यांना रक्कम येणे बंद झाले होते मात्र आज अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे अनिल जगताप यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आल्याची भावना अनेक शेतकरी बांधवांनी व्यक्त करून दाखवली आहे.
Back to top button
error: Content is protected !!