धाराशिव : मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग आहे. मराठवाड्यातील शेकडो शेतकरी दुष्काळ, नापिकीमुळे आत्महत्या करत आहेत. परंतु शेतकर्यांनी आत्महत्या न करता आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. शेतातील पिकासाठी हायड्रोजल उत्पादनाचा प्रयोग पाणी समस्येला चांगला पर्याय असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तथा कृषी मित्र अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
हायड्रोजल उत्पादनाविषयी बोलताना ते म्हणाले,जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी कृषी मित्र यांनी हायड्रोजलचा प्रयोग पाणी समस्येला पर्याय म्हणून पुढे आणलेला आहे. मका पिकाच्या बुडाला हायड्रोजल टाकल्यानंतर एक दिवस पाणी दिले तर पुढील महिनाभर या पिकाला पाणी द्यायची गरज नाही असा हा यशस्वी प्रयोग झालेला आहे. या भागातील शेतकर्यांनी देखील आपल्या शेतीसाठी हायड्रोजल प्रयोग करावा.असे आवाहनही त्यांनी केले.