ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन संघटनेचा मेळावा संपन्न

लोहारा/प्रतिनिधी
ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अहेमद अन्सारी यांच्या नेतृत्वा खाली मुस्लीम ओबीसी व अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम घेण्यात आला.
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील सभागृहात ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नागण्णा वकील होते. यावेळी ओबीसी मुस्लीम ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष मौलाना अलीमोद्दीन, सचिव गयासोद्दिन मुजावर ,अॅड ऊस्मान मोरवे, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अयनोद्दीन सवार, जेवळी सोसायटीचे चेअरमन पंडित पाटील, उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक अमीन सुंबेकर, प्रशांत काळे, के. डी. पाटील, जालिंदर कोकणे, , मिटु ढगे , प्रकाश भगत , अॅड तोफिक कमाल नगरसेवक अभीमान खराडे , प्रमोद बंगले, गौस मोमिन भाजपचे कमलाकर सिरसाट, यांची प्रमुख उपस्थिती होती. शब्बीर अन्सारी बोलताना म्हणाले की, धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. परंतु घटनेच्या ३४० कलमानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्यांना न्याय देण्याची तरतूद संविधानात करण्यात आली असतानाही न्याय मिळाला नाही. मोठ्या संघर्षानंतर मंडल आयोग लागू करून ओबीसी वर्गाला आरक्षण देण्यात आले. महाराष्ट्रात त्याची अमलबजावणी करताना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी हिंदू-मुस्लिमांमधील ओबीसी वर्गांना आरक्षण लागू केले. परंतु आरक्षणाबाबत मुस्लीम समाजात अद्यापही फारसी जागृती झालेली नाही. त्यामुळे राज्यभर मेळावे घेऊन याबाबत जागृती करत असल्याचे त्यांनी सांगितले. नागण्णा वकील, अॅड. मोरवे यांची भाषणे झाली. तसेच संघटनेच्या वतिने लोहारा न्यायालयातील शासकीय अभियोक्ता अॅड बालाजी ढेकणे यांची एम .पी .एस .सी री परीक्षा ऊतीर्ण झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला व . लोहारा तालुक्यातील अचलेर येथिल अॅडे . शिल्पा सुदर्शन सुरवसे ( बनसोडे ) यांचाही एम .पी .एस .सी शासकीय अभियोक्ता म्हणुन ऊतीर्ण झाल्याने सत्कार करण्यात आला , लोहारा शहरातील सकलेन शेख यांची लाईनमण म्हणुन ऊत्तीर्ण झाल्याने त्यांचा ही सत्कार संघटने च्या वतीने करण्यात आला तसेच दै . सकाळ चे पत्रकार निळंकठ कांबळे यांना जीवन गौरव पुस्कार मिळाल्याने यांचा हि सत्कार करण्यात आला . प्राचार्य दौलतराव घोलकर यांनी प्रास्ताविक केले तसेच शब्बीर गवंडी यांनी सूत्रसंचालन केले व सर्वाचे आभार मानले. यावेळी परवेज तांबोळी, रौफ बागवान, आयुब शेख, अजीज सय्यद, ताहेर फकीर, इस्माईल मुल्ला, जाकीर कुरेशी, अकबर तांबोळी, सादीक मुजावर गफार इनामदार, शरिफ मुल्ला, साहेबलाल मुजावर, शहबाज बागवान, इसूफ कुरेशी ,महेबुब कुरेशी , बिलाल मुल्ला , सलीम कुरेशी , महेबुब फकीर , आमिर शेख , गप्पार इनामदार , रफीक मुलानी , सोहेल मुल्ला रफिक पठान , सद्दाम मुलानी , फयाज शेख , कैफ पठाण सरफराज फकीर आदी उपस्थित होते.