धाराशिव : गॅस टँकर पलटी झाल्याने उच्च न्यायालयात रखडलेली खरीप 2020 पीक विम्याची अंतिम सुनावणी आता 5 मार्च रोजी होणार विमा अभ्यासक अनिल जगताप यांची माहिती.
खरीप 2020 च्या 168 कोटी रुपये रकमेसाठी उच्च न्यायालयात 1 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार होती मात्र दुर्दैवाने सिडको उड्डाण पुलाजवळ गॅस टँकर पलटी झाल्याने त्या दिवशी त्या परिसरातील पाच किलोमीटर अंतरावरील रस्ते ,मोबाईल टॉवर , वाहतूक व सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते सिडको उड्डाणपूल ते उच्च न्यायालय अंतर केवळ एक किलोमीटरचे आहे त्यामुळे त्या दिवशी उच्च न्यायालयात सुनावणी झाली नाही.
उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार खरीप 2020 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 524 कोटी रुपये रक्कम दे आहे मात्र पीक विमा कंपनीने आतापर्यंत केवळ 376 कोटी रुपये दिलेले आहेत वारंवार मागणी करूनही कंपनी पैसे देत नव्हती म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी महसुली कारवाई सुरू केली होती. त्या महसुली कारवाईला स्थगिती देताना उच्च न्यायालयाने दीडशे कोटी रुपये उच्च न्यायालय तर बारा कोटी रुपये जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्याचे अटीवर स्थगिती दिली होती कंपनीने ते पैसे भरले. त्यातील काही रक्कम शेतकऱ्यांना वाटण्यात आली आजही कंपनीचे उच्च न्यायालयात 75 कोटी जमा आहे उर्वरित 168 कोटी रकमेसाठी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
आता पाच मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सुनावणी कडे जिल्ह्यातील बळीराजाचे लक्ष लागले असून आशा आहे की उच्च न्यायालय धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चित न्याय देईल असे मत विमा अभ्यासक आणि जगताप यांनी व्यक्त केले.
Back to top button
error: Content is protected !!