लोहारा/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या वतीने धाराशिव जिल्ह्यात 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान गाव चलो अभियान राबवण्यात येत आहे.
भाजपा लोहारा तालुक्याच्या वतीने माळेगाव येथुन दि.4 फेब्रुवारी 2024 रोजी गाव चलो अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रमुख म्हणून उमरगा, लोहारा विधानसभा निवडणूक प्रमुख राहुल दादा पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, माळेगावचे सरपंच वैभव पवार, गावचलो अभियानाचे गाव प्रवासी कार्यकर्ता तथा भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, एससी जिल्हा सरचिटणीस वामन डावरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, माजी सरपंच अशोक पाटील, सेवानिवृत्त पोलिस पाटील राम पाटील, माजी चेअरमन काशिनाथ सुरवसे, गावचलो अभियान गाव संयोजक तथा तालुका चिटणीस युवराज जाधव, विजय पाटील, विश्वनाथ गर्जे, बबन सुर्यवंशी, शरद कुंभार, रविंद्र औरादे, शिवाजी गायकवाड, श्रीयेश जाधव, आदि उपस्थित होते. यावेळी उमरगा लोहारा विधानसभा निवडणूक प्रमुख राहुल दादा पाटील, तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, वामन डावरे, यांनी पंतप्रधान मोदी व राज्य सरकारनी सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती सांगितली. यावेळी मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली व लोकांना संपर्क करुन केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन युवराज जाधव यांनी केले तर आभार विश्वनाथ गर्जे यांनी मानले. या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.