धाराशिव : संभाजीनगर येथे सिडको उड्डाणपूला जवळ गॅस टँकर पलटी झाल्याने खरीप 2020 बाबतची अंतिम सुनावणी होऊ शकली नाही नवीन तारीख लवकरच उच्च न्यायालय देणार विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी माहिती दिली.
खरीप 2020 च्या 168 कोटी रुपये रकमेसाठी उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती . जिल्हाधिकारी धाराशिव यांनी सुरू केलेल्या त्यावेळेसच्या महसुली कारवाईला स्थगिती देताना उच्च न्यायालयाने दीडशे कोटी रुपये न्यायालयात तर बारा कोटी रुपये जिल्हाधिकारी यांच्याकडे भरण्याच्या अटीवर स्थगिती दिली होती कंपनीने की रक्कम भरली होती त्यातील 75 कोटी रुपये व जिल्हाधिकारी यांच्याकडील बारा कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप केले आहे त्यातील आणखी75 कोटी रुपये न्यायालयात जमा असून उर्वरित 93 कोटी रुपये पीक विमा कंपनीकडून येणे बाकी आहे त्यासाठीम एक फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती उच्च न्यायालयाने एक व दोन फेब्रुवारी रोजी ही अंतिम सुनावणी ठेवली होती मात्र एक फेब्रुवारी रोजी शहरातील सिडको उड्डाणपूला जवळ एच .पी कंपनीच्या गॅस टँकर ला पहाटे पाच वाजता अपघात होऊन मोठ्या प्रमाणात गॅसची गळती झाल्याने पाच किलोमीटर परिसरात खबरदारी घेण्यात आली होती टँकर मधील गॅस पाच किलोमीटर परिसरात पसरण्याची शक्यता असल्याने लाईट, मोबाईल टॉवर्स, रस्ते बंद करण्यात आले होते उड्डाणपुलापासून उच्च न्यायालय केवळ एक किलोमीटर अंतरावर ती आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून त्या दिवशी उच्च न्यायालयात कुठल्याच प्रकारची सुनावणी झाली नाही त्यामुळे खरीप 2020 ची सुनावणी त्या ठिकाणी होऊ शकली नाही लवकरच उच्च न्यायालय नवीन तारीख देऊन त्या संदर्भातील सुनावणी घेऊन शेतकऱ्यांना न्याय देईल अशी आशा विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी व्यक्त केली आहे.