लोहारा : लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलची शैक्षणिक सहल दिनांक 03/02/2024 रोजी रात्री ठिक 10.00 वा. शाळेतून छ. शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ला, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याठिकाणी सत्याग्रह केला ते महाडचे चवदार तळे, पाचाड येथील राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची समाधीस्थळ, नैसर्गिक गरम पाण्याचे झरे, हरिहरेश्वर व श्रीवर्धन येथील समुद्र किनारा, जलदुर्ग मुरुड – जंजिरा, अशा ऐतिहासीक ठिकाणास भेट देवून तेथील सर्व वैभव पाहण्यासाठी दिनांक 04 व 05 फेब्रुवारी या 2 दिवसासाठी रवाना झाली. यावेळी सहल सुखरूप जावून यावी यासाठी पालक शिक्षक समितीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब पाटील, श्री नाना पाटील ,श्री ओम कोरे, श्री शिवराज झिंगाडे, श्री देवराव देवकर, श्री बालाजी बिराजदार, डॉ सुनिल मंडले, यांच्या हस्ते बस गाडीचे श्रीफळ अर्पण करून पूजन करण्यात आले.
HTML img Tag
याप्रसंगी स्कुलचे मुख्याध्यापक श्री शहाजी जाधव, प्रा.यशवंत चंदनशिवे, श्री सिद्धेश्वर सूरवसे, श्री व्यंकटेश पोतदार, पालक श्री रामचंद्र गायकवाड, श्री विठ्ठल धवन, श्री शंकर जाधव, श्री अमोल लोमटे, श्री जयराम लोमटे, श्री माधव सिरसाठ,श्री दगडू पांढरे, श्री दिगंबर देवकर, श्री मार्तंड शिंदे, श्री शिवाजी मुसंडे, श्री सम्राज पाटील, श्री विठोबा जाधव, श्री विश्वनाथ रसाळ, श्री अनिल चव्हाण, श्री शरद पवार, श्री मुकुंद शिंदे, श्री दादासाहेब रवळे, श्री दशरथ पवार, श्री दत्ता स्वामी, श्री अभिजित लोखंडे, श्री गणेश जाधव, श्री नरसिंग मुळे, श्री दिपक स्वामी, श्री राघव पाल, श्री लालधारी साव,नगरसेविका सौ आरती कोरे,मिस मीरा माने, मिस. माधवी होगाडे, मिस अनिता मनशेट्टी, मिस अर्चना सोणके, सौ मिनाक्षी मंडले, सौ माधुरी झिंगाडे, सौ भाग्यश्री रवळे यांच्यासह महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वच पालकांनी शैक्षणिक सहलीतील सहभागी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांना सहल नियोजनाप्रमाणे सुखरूप व यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या…

HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!