धाराशिव : धाराशिव येथे महिला आघाडी मोर्चा ची बैठक आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पक्ष संघटन वाढविण्यासाठी महिला आघाडीची कार्यकारणी घोषित करण्यात आली. यामध्ये भाजपा महिला आघाडी मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी लोहारा शहरातील नगरसेविका सौ. आरती सतिश गिरी यांची निवड जाहिर करण्यात आली. यावेळी भाजपा महिला आघाडी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा वर्षा भोसले, मराठवाडा समन्वयक रेखा हाके, प्रदेश सरचिटणीस तथा धाराशिव जिल्हा समन्वयक मीनाताई मिसाळ, जिल्हाध्यक्ष नंदाताई पणगुडे, माजी जि.प. अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, मा.जि.प.सदस्या तथा सरपंच शितलताई राहुल पाटील, विद्या ताई माने, लोहारा महिला शहराध्यक्षा सोनाली सातपुते, यांच्यासह जिल्ह्यातील महिला पदाधिकारी मोट्या संख्येने उपस्थित होत्या.