छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करुन विद्यार्थ्यानी जिंकली उपस्थिताची मने

लोहारा : लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलचे वार्षिक दहावे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे या होत्या. तर शेतकरी विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकभाऊ जवळगे, किशोर साळुंखे, माजी जि.प. सदस्य व दीपक जवळगे, यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या त्यामध्ये पारंपारिक गीत, शेतकरी नृत्य, मोबाईल थीम व फनी डान्स, लावणी, व लोकगीत, हिंदी गीतासह व सर्वांना आकर्षित करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाटिका अशा विविध कला सादर करण्यात आल्या. नर्सरी पासून सर्व बाल कलाकारांनी आपली कला सादर केली.

तसेच दापोली येथे लाटी काठी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलेल्या व ऑलंपियाड परीक्षेमध्ये गोल्ड मेडल मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रचंड प्रमाणात पालकांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. अतिशय मनमोहक, आकर्षक व नवचेतना देणारी कला या ठिकाणी मुलांनी सादर केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओम सूर्यवंशी यांनी केले. तर आभार सुनील कांबळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!