आष्टा कासारच्या नेत्र शिबिरातील रुग्णावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न

आष्टा कासार ता. लोहारा :- आष्टा कासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुउद्देशीय सामाजिक संस्थे तर्फे दि. 04 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या नेत्र व दंत शिबिरातील रुग्णावर आज दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. या शस्त्रक्रिया जे एस अजमेरा रोटरी क्लब धाराशिव च्या साह्याने या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिरा मध्ये 295 रुग्णाची नेत्र तपासणी करण्यात आली होती. त्यातील नऊ रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रिया अजमेरा रोटरी क्लब धाराशिव तर्फे मोफत करण्यात आल्या. या साठी अजमेरा रोटरी क्लबचे सचिव प्रमोदजी दंडवते साहेब यांच्या मार्गदर्शना खाली डॉ. ईसाके साहेब व त्यांच्या अजमेरा टीप ने उत्कृष्ट अशी सेवा देऊन यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण केल्या.
या साठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वसंतराव सुलतानपूरे गुरुजी, सचिव सिद्रामप्पा तडकले गुरुजी, सहसचिव सुभाष बलसुरे सर, मुरलीधर गोसावी सर, बनसोडे सर, वाघमोडे सर, नितीन अष्टेकर सर, चांद अष्टेकर सर, विष्णुपंत सगर सर, आळंगे सर, प्रा.तडकले सर,अण्णाराव पाटील सर, शिदोरे सर, कडते सर,बचाटे सर, विलास पोतदार सर, शरणप्पा फुंड्डीपल्ले सर,व इतर सर्व सेवानिवृत्त टीमने परिश्रम घेऊन हे शिबिर संपन्न केले. आष्टा कासार व सर्व परिसरात या शिबिराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
अनुकरणीय उपक्रम असे उदगार स्वामी समर्थ मंडळाचे भक्त मुकेश मुळे यांनी प्रशंसा केली. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानदृष्टी प्रधान करून आता ज्येष्ठांना नवदृष्टी देण्याचे कार्य खरंच कौतुकास्पद आहे. हा सामाजिक कार्याचा वसा सर्वांनी घेणे गरजेचे आहे. सेवा देणारे भरपूर जण आहेत. पण ती सेवा गरजवंता पर्यंत पोहोचण्याचे कार्य करणे गरजेचे आहे. जे आज आष्टा कासार येथील सेवानिवृत्त शिक्षक संघटनेने केले आहे. ज्यांचं वय निवृत्तीच व आरामदायी जीवन जगण्यासाठीचे आहे, ते सध्या असे उत्कृष्ट कार्यात कार्यरत आहेत. हा आदर्श गावातील जनतेने घेण्यासारखा आहे.या गुरुजनांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. असे गौरव उद्गार जनतेतून निघत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!