‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेस गुलाबी थंडीतही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

लोहारा : ‘सकाळ’च्या वतीने रविवारी (ता.२२) आयोजित चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुलाबी थंडीतही विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साहा पाहायला मिळाला.
विद्यार्थ्यांना आपले विचार मुक्तपणे व कलात्मक पध्दतीने मांडता यावेत, यासाठी ‘सकाळ’च्या वतीने दरवर्षी चित्रकला स्पर्धा घेतल्या जातात. शहरातील लोहारा हायस्कूलच्या प्रांगणात रविवारी सकाळी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. डॉ. हेमंत श्रीगिरे, माजी नगरसेवक श्रीनिवास फुलसुंदर, महेबूब गवंडी यांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेस प्रारंभ झाला.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी मुख्याध्यापक वसंत राठोड, प्राचार्य शहाजी जाधव, सलीम शेख, सतीश जट्टे, बालाजी बिराजदार, गणेश खबोले, चंद्रकांत जट्टे, एम. एस. भोजने, भिमाशंकर डोकडे, शैलेश जट्टे, बाबा मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मागील काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. गुलाबी थंडीतही विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या भावविश्वात रमून गेले. हायस्कूल लोहारा, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल यासह अन्य शाळेतील पहिली ते दहावी वर्गाती सुमारे ९६ विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. पर्यवेक्षक म्हणून व्यंकटेश पोतदार, भिमाशंकर डोकडे, सतीश जट्टे यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी मुन्ना फकीर, बापू घाडगे, शेषेराव घोडके, ‘सकाळ’चे बातमीदार निळकंठ कांबळे यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!