लोहारा शहरातील सप्तशृंगी मंगळागौर ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला

लोहारा : दिनांक 29/08/2023 रोजी लेडीज क्लब उस्मानाबाद आयोजित मंगळागौरी स्पर्धा 2023 अतिशय उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत लोहारा येथील सप्तशृंगी मंगळागौर ग्रुपने अंकिता (डॉली )कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम क्रमांक पटकावला. सप्तशृंगी ग्रुपने या स्पर्धेत भारतीय पारंपारिक नृत्यातून बालविवाह प्रतिबंध याविषयी सामजिक संदेश दिला तसेच फुगडी, झिम्मा, कोंबडा, झोका, सूप – कलशी या महाराष्ट्रीयन खेळांचे सादरीकरण केले.
सप्तशृंगी या ग्रुपमध्ये ललिता कांबळे, सविता जाधव, ज्योत्स्ना चांदणे, भाग्यश्री कुंभार, प्रियांका भंडारे, प्रणाली सावंत, मनिषा राठोड,शीतल पांचाळ, या सहभागी होत्या, त्यांना सप्तशृंगी मंगळागौर ग्रुपने कार्यक्रमाप्रसंगी अतिशय उत्कृष्ट मंगळागौर नृत्य सादर करत उपस्थित महिलांचे मने जिंकली आणि 50,000 रुपयांचे प्रथम पारितोषक जिंकले. या स्पर्धेच्या आयोजक लेडीज क्लब उस्मानाबादच्या अध्यक्षा सौ अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते पारितोषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.