मांजरा महिला अर्बन को-ऑपरेटिव क्रेडीट सोसायटी लि.लातुर कडून अँटोरीक्षा वाटप

लोहारा ( जि.धाराशिव ) : औसा शहरात मांजरा महिला अर्बन को-ऑपरेटिव क्रेडीट सोसायटी लि.  लातूर शाखा औसा शहरात सुरु झाली. ग्राहकांना तात्काळ सुविधा देण्याचा या मांजरा महिला अर्बन चा प्रामाणिक प्रयत्न आहे. विश्वासास पात्र राहून बँकेंने अल्प अवधीत कर्ज वितरणास सुरुवात केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

याचाच एक भाग म्हणून अजित अप्पाराव खोत यांना ऑटो रिक्षाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी औसा माजी नगरध्यक्ष सुनील मिटकरी, माजी नगरसेवक श्री वेंकटेश कोद्रे, मांजरा महिला अर्बन चे मुख्यकार्यकारी संचालक शिवकांत गंगापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच लातूर मल्टीस्टेट चे शाखाधिकारी श्री राहुल देशमुख, कैलास दोर्वे, रियाज शेख, सचिन पवार शिवसेना उपशहर प्रमुख औसा , बालाजी शिनगारे, अयाज होनाळे, दिगंबर सुरवसे, अर्जुन गाडेकर, प्रकाश गवळी, किशोर मोरे, जीवन भोसले, कटके महाराज, आकाश सुरवसे, विशाल सुडके, कांचन वेदपाठक, सानिया शेख आदी उपस्थित होते. छोट्या व्यवसायाकडे कर्ज वितरण करण्याचा बँकेचा मानस आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!