लोहारा शहरात आमदार चषक २०२४ या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरात आमदार चषक २०२४ या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ५) मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप व गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले.

आमदार ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर लोहारा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील पालावरील कुटुंबात राहणाऱ्या महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, सदानंद शिवदे पाटील, माजी नगरसेवक अभिमान खराडे, नगरसेवक अमीन सुंबेकर, अविनाश माळी, आरती कोरे, शमाबी शेख, श्रीकांत भरारे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब शेख, दिपक रोडगे, प्रमोद बंगले, राजेंद्र माळी, ओम कोरे, प्रताप लोभे, दत्ता मोरे, शिवराज चिनगुंडे, माजी नगरसेवक पंढरीनाथ कोणे, विधानसभा अध्यक्ष शरद पवार, उमरगा शिवसेना शहरप्रमुख योगेश तपसाळे, परमेश्वर साळुंके, कुलदीप गोरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!