गोव्याचे मुख्यमंत्री यांचे मित्रांच्या वतीने तुळजापूर मध्ये जंगी स्वागत

तुळजापुर : गोवा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री डॉ. श्री.प्रमोद सावंत यांचा तुळजापूर येथे सर्व मित्रांच्या वतीने जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तुळजापूर शहरामध्ये ठीक ठिकाणी डिजिटल लावण्यात आले .मंदिर देवस्थान कार्यालयात मुख्यमंत्री साहेबांचा सुंदर फेटा , पुष्पहार ,शाल ,देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ.अभय लूनावत, (माढा), डॉ. हेमंत श्रीगिरे, (लोहारा ), डॉ. मेहबुब मुलानी, (दाळींब), डॉ.जितेंद्र पाटील, (नळदुर्ग) डॉ. शिवशंकर शिवगुंडे, (आलुर), डॉ.संजय कदम, (जळकोट) हे सर्व मित्र सह कुटूंब हजर होते. या प्रसंगी श्री विशाल रोचकरी, श्री.उत्तमराव पाटील, व इतर मित्र मंडळी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ अभय लूणावत यांनी विशेष परिश्रम घेतले.