लोहारा ( जि.धाराशिव ) : वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय लोहारा येथे आज दिनांक 9 जुलै 2024 रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीमती यु. व्ही .पाटील मॅडम या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुभाष चव्हाण साहेब विस्तार अधिकारी, गटशिक्षण कार्यालय, लोहारा हे होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोहारा येथील डॉक्टर गुणवंत वाघमोडे हे होते. या कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक महाराष्ट्र गीताने झाली. यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनील बहिरे सर यांनी केले. महाविद्यालयाचा इतिहास व विद्यार्थ्यांची प्रगती याविषयी थोडक्यात माहिती सरांनी दिली.
यानंतर खालील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
एस. एस. सी. १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल १०० % .
प्रथम क्रमांक. कु. अश्विनी हणमंत रसाळ 93%, द्वितीय क्रमांक अस्मिता अमोल शिवकर 92.40 %, तृतीय क्रमांक सपना नेताजी भोकरे 92%, या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच शाळेतून प्रथम आलेल्या अश्विनी हनुमंत रसाळ या विद्यार्थिनीला प्राचार्य श्रीमती यु. व्ही. पाटील मॅडम यांच्या वतीने रोख रक्कम व पारितोषिक देण्यात आले.
यानंतर H. S. C. १२ वी बोर्ड परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला.
प्रथम क्रमांक श्रुती बालाजी पाटील ८५. ६७% .
द्वितीय क्रमांक निहा मुकरम मणियार ८३.६७ % .
तृतीय क्रमांक प्रतीक राजेंद्र माळवतकर ८३.३३ % .
बारावी वाणिज्य शाखा (निकाल 98.38%).
प्रथम क्रमांक अंकिता भुजंग जावळे ८८% .
द्वितीय क्रमांक निखिल नानासाहेब गोरे ८४.८३% .
तृतीय क्रमांक क्रांती काकासाहेब सूर्यवंशी ७८.१७% .
बारावी कला शाखा (एकूण निकाल 87.69%)
प्रथम क्रमांक कीर्ती तुषार चव्हाण 80.33%.
द्वितीय क्रमांक फरहाना फिरोज पठाण 78.67%.
तृतीय क्रमांक अंकिता गुणाजी बनसोडे 77.33%.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्रतीक राजेंद्र माळवतकर या विद्यार्थ्याने फिजिक्स या विषयात 94% परसेंटेज गुण घेतल्यामुळे प्रा. राजेंद्र साळुंखे यांच्या वतीने 500 रुपयांचे पारितोषिक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. कै. गणपतराव काळे यांच्या स्मरणार्थ प्रा. प्रशांत काळे यांच्या वतीने कला विज्ञान व वाणिज्य शाखेतून प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यास प्रत्येकी १००० रुपये व ५०० रुपये रोख पारितोषक प्रदान करण्यात आले. कै. मुरलीधर महाराज यांच्या स्मरणार्थ प्रा. विद्यासागर गिरी यांच्या वतीने मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख १००० रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना N. M. M. S. सन 2023-24 मध्ये इयत्ता आठवीतील वीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. M. T. S. परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी कु. भक्ती गोविंद कोकाटे हिचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच वाणिज्य शाखेतील अकाउंट या विषयात पाच विद्यार्थ्यांनी शंभर पैकी 100 गुण घेतल्यामुळे प्रा. विजय उंबरे सर यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. सुभाष चव्हाण साहेब यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन केले. डॉ. गुणवंत वाघमोडे साहेब यांनी बिकट परिस्थिती असली तरी विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे हे उदाहरण देऊन सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पाटील यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष देणे गरजेचे आहे तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल व सोशल मीडिया पासून दूर राहिले पाहिजे हे सांगितलं.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन शिंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री श्रीकांत मोरे सर केले.यावेळी श्री भास्कर जाधव सर, प्रा. एल. पी. कुलकर्णी सर, प्रा. विद्यासागर गिरी, श्री. बालाजी ईरुदे सर, श्री. डी. आर. जाधव सर,श्री. नागनाथ पांढरे सर, प्रा. विठ्ठल कुन्हाळे, प्रा. आर. सी. अष्टेकर सर, प्रा.आर . डी .साळुंके प्रा. उध्दव सोमवंशी, प्रा. नारायण आनंदगावकर, प्रा. डी. आर साठे, प्रा. बालाजी सूर्यवंशी यांच्या सह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.