लोहारा ( जि.धाराशिव ) : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज बुधवारी 1 मे रोजी लोहारा हायस्कुल प्रशालेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री वसंत राठोड यांनी प्रशालेला 65 हजार रुपये खर्च करून 50 सायकलीसाठी सायकल स्टॅन्ड तयार करून शाळेला भेट दिले.
मुलांची सायकल चालवण्याकडे कल वाढावा व प्रदूषण मुक्ततेकडे वाटचाल व्हावी हा उद्देश समोर ठेवून श्री व सौ राठोड वसंत भीमा यांनी त्याचे शाळा अर्पण केले. सेवेत असताना सर्वच शिक्षक शाळेसाठी झटत असतात पण निवृत्तीनंतरही त्या शाळेची प्रगती झाली पाहिजे हे ध्येय ठेवून त्यांनी शाळां उपयोगी सायकल स्टॅन्ड प्रशालेला भेट दिले. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री डी.एम. पोतदार, श्री वैजनाथ होळकुंदे, श्री आर. के.पोतदार ,श्याम पोतदार , पत्रकार निळकंठ कांबळे, श्रीनिवास माळी, हरी लोखंडे , आयुब शेख, माणिक तिगाडे व सौ.नंदा राठोड यांच्यासह प्रशालेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.