लोहारा शहरातील संभाजी पोतदार यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देवून गौरव

लोहारा : धाराशिव येथील पांचाळ सोनार समाजसेवा संस्थेच्या वतीने लोहारा शहरातील संभाजी पोतदार यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे.
धाराशिव येथील पुष्पक मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थांनी जयदिप रत्नपारखी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापुरचे उद्योजक अविनाश पंडीत, पांचाळ सोनार समाजाचे सोलापुर अध्यक्ष निलेश धाराशिवकर, पांचाळ सोनार सेवा संस्थेचे अध्यक्ष मनोज पंडीत, ब.ल.पोतदार,नागपुर पोलीस उपअधिक्षक रोहीणी पोतदार, सविता पंडीत,बालाजी पोतदार, रामचंद्र पोतदार, निवृत्ती वेदपाठक, शुभागी पोतदार, संगिता पोतदार यांच्या आदी उपस्थित होते.