विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतुन यशाकडे वाटचाल करावी – बीडीओ शितल खिंडे

लोहारा : लोहारा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी श्रीहरी कोठा सहलीसाठी निवड झालेल्या लोहारा तालुक्यातील शेख सिमरन रसूल जिल्ह्यातून सर्वप्रथम, शिंदे संध्या खंडू, अगंबरे समीक्षा प्रवीण जिल्ह्यातुन परीक्षेद्वारे निवड झाल्याबद्दल तिन्हीं विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला केला.
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी.वेळोवेळी होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन जिद्द,चिकाटी, एकाग्रतेने अभ्यास करून नावलौकिक मिळवावा असे प्रतिपादन गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी केले.अभ्यास कसा करावा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव,सुभाष चव्हाण, केंद्रीय मुख्याध्यापक मधुकर रोडगे, मधुकर चंदनशिवे, केंद्रप्रमुख गजानन मक्तेदार, सहशिक्षक प्रविण अगंबरे, गुरूनाथ पांचाळ,नितीन कदम,बालाजी सोमवंशी,अनंत सुतार, राजू तोडकरी उपस्थित होते.