राज्यस्तरीय “आदर्श शिक्षक” पुरस्कार जाहीर

लोहारा (जि.धाराशिव ) : प्राचार्य श्री शहाजी महावीर जाधव यांना राज्यस्तरीय “आदर्श शिक्षक” पुरस्कार जाहीर…. सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी दिनांक 03 डिसेंबर 2023 रविवार रोजी सकाळी 10:30 वा.पुणे येथील यशवंतराव चव्हाण ज्ञानप्रबोधिनी (यशदा) च्या सभागृहामध्ये ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना.श्री गिरीशजी महाजन (उद्घाटक), कल्याणचे लोकसभा सदस्य मा.खा.श्री श्रीकांतजी शिंदे, महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव मा.श्री एकनाथजी डवले ( प्रमुख अतिथी),आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, आदर्श गाव योजना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा.पद्मश्री पोपटराव पवार, तसेच सरपंच परिषद मुंबईचे प्रदेशाध्यक्ष श्री दत्तात्रय काकडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमामध्ये धाराशिव जिल्ह्यातील लोहारा सारख्या भागामध्ये न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागातील पालकांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अथक परिश्रम घेत या भागातील सामाजिक कार्यात सहभागी होवून आपला एक वेगळा ठसा उमटवला आणि अल्पावधीतच नावलौकीक प्राप्त केले आहे. तसेच 10 वर्षात आपल्या शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्यामुळे उस्मानाबाद एज्यूकेशन सोसायटी गुंजोटि ता.उमरगा संचलित न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल लोहाराचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य श्री शहाजी महावीर जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते ” राज्यस्तरीय आदर्श शिक्षक” पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. श्री शहाजी जाधव यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास भोसले, उपाध्यक्ष श्री बालाजी जाधव, संचालिका सौ सुनीता गायकवाड, सौ. माधुरी चोबे, सौ.सविता जाधव, स्कुलचे पर्यवेक्षक प्रा. यशवंत चंदनशिवे, शिक्षक श्री सिध्देश्वर सूरवसे, पालक श्री अरुण सारंग, श्री सतिश गिरी, श्री शिवराज झिंगाडे, श्रीनिवास माळी, श्री बालाजी बिराजदार, श्री रमेश वाघुले यांच्यासह सर्व शिक्षक कर्मचारी व शुभचिंतक व मित्र परिवार या सर्वांनी अभिनंदन करून भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.