मराठवाडा मुक्तीसंग्राम कृतज्ञता रथयात्रेचे लोहारा शहरात उत्साहात स्वागत

लोहारा (जि.धाराशिव ) : मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त कृतज्ञता रथयात्रा दिनांक 01 सप्टेंबर रोजी माहूरगड येथून सुरूवात झाली आहे, हि रथयात्रा 13 सप्टेंबर रोजी लोहारा शहरातील भारतमाता मंदिर याठिकाणी आगमन झाल्यानंतर लोहाऱ्याचे तहसीलदार श्री प्रसाद कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक श्री पवार यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे व रथयात्रेचे पूजन आणि स्वागत करण्यात आले.
त्यानंतर हि रथयात्रा भारतमाता मंदिर ते छ. शिवाजी महाराज चौक, म.फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जगदंबा देवी मंदिर, अशी मार्गक्रमण करत असताना लोहारा शहरात ठिकठिकाणी विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, मित्र मंडळ,संघटनेचे पदाधिकारी श्री अविनाश माळी, श्री विक्रांत संगशेट्टी, श्री दगडू तिगाडे श्री संभाजी पोतदार, श्री गौरव गोसावी, श्री सागर गिरी, श्री प्रतीक गोसावी, श्री बालाजी बिराजदार, श्री राजेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते पूजन व स्वागत करण्यात आले.
तसेच हिप्परगा रवा येथील स्मृतिस्तंभास अभिवादन करुन समारोप करण्यात आला. याप्रसंगी रथयात्रेमध्ये लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे विध्यार्थी, आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नांदेड विभाग मंत्री शुभम स्वामी, लातूर विभाग मंत्री अजित केंद्रे, भागवत राऊत परभणी, लोहारा येथील जनकल्याण समितीचे श्री शंकर जाधव, धाराशिव जिल्हा सेवा प्रमुख श्री शहाजी जाधव, लोहारा तालुका कार्येवाह श्री मनोज तिगाडे, प्रा.यशवंत चंदनशिवे, श्री प्रमोद पोतदार, श्री कल्याण ढगे, श्री दत्तात्रय पोतदार, श्री कमलाकर सिरसाठ, श्री संजय जेवळीकर,श्री किशोर होणाजे, श्री मनोज सोमवंशी, श्री विजय लोमटे, श्री मुरलीधर होनाळकर, श्री गणेश हिप्परगेकर, श्री जीवन होनाळकर, श्री प्रदीप ढोबळे,श्री विरेश स्वामी, श्री व्यंकटेश पोतदार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.